वाटेवरती विज्ञानाच्या येता येता,शोध सुखाचा आयुष्यात घेता घेता
आल्या आल्या हो वेगे वेगे प्रदूषणाच्या लाटा लाटा
सुख उपभोगत, उपभोगत
मानव झाला मस्त, मस्त
अशुद्ध हवेत श्वास घेऊन होतो माणूस त्रस्त, त्रस्त
उजाड शेती मळा, उजाड डोंगर माथा
म्हणे पावसास तू दूर जा आता, तू दूर जा आता
प्रदूषणाच्या विळख्याने बिघडत चालले आरोग्य
जपूया निसर्गाचे पर्यावरण हेच होईल योग्य
हरवून गेले सारे, मोटार गाड्यांच्या धुरात
करूया फुले, वाहणारे वारे सुगंधित
उद्याच्या भविष्याचा विचार करूनी
विल्हेवाट कचऱ्याची व्यवस्थित लावूनी
टाळूया ध्वनि प्रदूषण ,थांबवुनी जल प्रदूषण
होई तयाने प्रदूषणावर अंमळ नियंत्रण
घेऊ या शपथ, होऊ या सुपंथ
गटार गंगा म्हणुनी वाहते ती हुळहुळत
काढुनी तिची दृष्ट, करू त्या नदीचे रुप झुळझुळतं
ना अडवी रस्ता कोणासी परी
पाणी अडवूया शेतीदारी
ना कुणाची जिरवणे,ना अडवणे न येऊ दे आपल्या ध्यानी
जिरवी पाणी,पाणी जिरवी हेच असू दे सतत आपल्या मनी
ना करू कुणाची कुणाशी लावा लावी
त्यापरी ताजा श्वास घेण्यासाठी, आपण झाडे लावावी झाडे फुलवावी
हाच आहे आपला 'निसर्ग नवस', हाच आहे आपला निसर्ग नवस!
रो.डॉ.शुभांगी कोठारी
रोटरी क्लब ऑफ निगडी पुणे