रोटरी क्लब ऑफ पुणे सहवासचा गांधी भवन अंधशाळेतील मुली व कर्मचाऱ्यांकरिता खास प्रकल्प
Back
रोटरी क्लब ऑफ पुणे सहवास, वन नेटवर्क, मेट्रोपोलीस लॅब आणि सकाळ सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने द पूना स्कूल अँड होम फॉर ब्लाइंड गर्ल्स कोथरूड येथील शाळेतील मुलींच्या पॅथॉलॉजी टेस्ट पूर्णपणे मोफत करण्यात आल्या. या प्रसंगी सकाळ सोशल फाउंडेशनचे श्री महेंद्र पिसाळ सर, मेट्रोपोलीस चे बिजनेस हेड श्री शरदचंद्र हवल या सर्वांना एकत्रित आणणारे ज्यांच्या कनेक्ट मुळे मेट्रोपोलीस ने आपल्याला 3650 रुपयांची ही टेस्ट उपलब्ध करून दिली. ज्यामध्ये गांधी भवन येथील अंधशाळेच्या मुली, शाळेचा कर्मचारी वर्ग आणि उपस्थित सहवासीय सदस्य अशा सर्वांची आपण टेस्ट केली . ज्याची एकत्रित कॉस्ट काढली तर ती साडेसात लाख रुपये आहे. ज्यामध्ये आपण मुलींचे HB-A1, VITAMIN D3, HIMOGRAM, VITAMIN B12 या सगळ्या टेस्ट केल्या.
सहवासीय AG. रोटेरियन किरण इंगळे तुमच्या या इनिशिएटिव्ह करता व्यक्त करावे तेवढे आभार कमीच आहेत. मनःपूर्वक धन्यवाद. वन नेटवर्क कडून आपल्याला या प्रोजेक्ट करता रुपये 15000 मदत मिळाली. खूप खूप धन्यवाद समीर सर. चार्टर्ड प्रेसिडेंट रोटेरियन शेखर टाकळकर यांनी अँन अपर्णाताई यांच्या वाढदिवसाप्रित्यर्थ पुणे अंधशाळेला रुपये 5000 देणगी दिली. खूप धन्यवाद शेखरजी आणि अपर्णाताई. अपर्णाताईंचा वाढदिवस मुलींनी सुंदर गाणं म्हणून साजरा केला आणि त्यांना शुभेच्छा दिल्या.
60% पेक्षा जास्त अंध असलेल्या मुलींना येथे ऍडमिशन दिले जाते. शाळेचे मुख्याध्यापक श्री. सरगम सर यांनी अंध असूनही what's app कसे वापरतात ही सगळ्यांना असलेली उत्सुकतेचे निरसन करताना प्रात्यक्षिक दाखवले. मुलींचे सुंदर निखळ हसरे चेहरे खूप काही शिकवण देणारे होते. आपल्यामध्ये कोणतीतरी कमतरता आहे असं अजिबात त्या सुंदर चेहऱ्यांकडे पाहून वाटत न्हवते. सगळा कर्मचारी वर्ग त्यांची खूप छान काळजी घेत होता आणि त्यांना धीर देत होता. मेट्रोपोलीस च्या स्टाफचे देखील कौतुक. अतिशय सामंजस्याने ते मुलींचा कल बघून तपासणी करत होते.
रोटरी च्या वर्षातील आजचा अंध शाळेतील मुलींबरोबर चा दिवस हा खरोखरच डोळे उघडणारा ठरला!