रोटरी क्लब ऑफ पुणे गांधीभवनचे पालकांसाठीचे विशेष मार्गदर्शन सत्र
रोटरी क्लब ऑफ पुणे गांधीभवनच्या वतीने ५ ऑक्टोबर रोजी वनाज परिवार विद्यामंदिर येथे पालकांसाठी एका विशेष मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले होते.
Childline ह्या संस्थेच्या माध्यमातून बालहक्कासाठी झटणाऱ्या डॉ. अनुराधा सहस्त्रबुद्धे यांनी पालकांना, मुलांच्या होणाऱ्या लैंगिक शोषणाच्या अनुषंगाने मार्गदर्शन केलं.
Good touch.. Bad touch विषयी मुलांना कसं जागृत करायचं याबद्दल त्यांनी पालकांशी संवाद साधला.
पालकांनी देखील मोठया संख्येने उपस्थित राहून सहस्रबुद्धे मॅडमना मनातील शंका विचारल्या.
सध्याच्या काळातील ज्वलंत प्रश्नावर ही चर्चा अतिशय गरजेची होती. त्यासाठी क्लबने पुढाकार घेतल्यामुळे शाळेने समाधान व्यक्त केले.
यावेळी प्रेसिडेंट रो.मीनल धोत्रे, क्लब सेक्रेटरी रो. शशांक टिळक, प्रोजेक्ट डायरेक्ट रो. उज्ज्वला बर्वे, क्लबमधील इतर सदस्य, शाळेच्या मुख्याध्यापिका आणि इतर शिक्षिका उपस्थित होत्या.