Editor
Rtn. Shubhangi Mulay
September-2024
District Governor
Rtn. Shital Shah

अर्थछाया Back

अर्थछाया

दिनांक ११ ऑगस्ट रोजी डिस्ट्रिक्ट व्होकेशनल टिम तर्फे गुंतवणूक क्षेत्रातील अत्यंत लोकप्रिय व प्रथितयश व्यक्तिमत्व सी. ए. रचना रानडे ह्यांना डिस्ट्रिक्ट व्होकेशनल एक्सलन्स अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. कोणतेही सामाजिक काम करण्यासाठी आपली स्वत:ची अर्थ स्थिती मजबुत असणे गरजेचे असते त्यामुळे या कार्यक्रमाला ‘अर्थछाया’ हे नाव देण्यात आले होते.

व्होकेशनल एक्सलन्स अवॉर्ड हे अशाच व्यक्तिला दिले जाते की जी स्वत:चा व्यवसाय करीत असताना अनेकांना स्वत:च्या पायावर उभे रहाण्यास मदत करते. त्यामुळेच या अशा महत्वाच्या पुरस्कारासाठी सी. ए. रचना रानडे यांची निवड करण्यात आली. घरोघरी गुंतवणूकदार हा एक वेगळाच विचार त्यांनी मांडला. ८० लाखाहून अधिक यूट्यूबवर फॉलोअर्स असणाऱ्या रचना रानडे हे एक विलक्षण सामान्यातून असामान्यत्वाकडे झेप घेणारे अफलातून व्यक्तिमत्व आहे. त्यांनी त्यांच्या पंचेचाळीस मिनिटाच्या भाषणातून जुन्या इनव्हेस्टमेंट आणि नवीन इनव्हेस्टमेंट यांचा तुलनात्मक योग्य तो विचार मांडला. मार्केट मध्ये पैसे गुंतवताना तुमच्या मनाला पटेल त्याचा सारासार विचार करून छोट्या रकमेपासून गुंतवणूक करा असा अतिशय योग्य सल्ला त्यांनी दिला.

हा पुरस्कार देण्यासाठी कोहिनूर उद्योग समुहाचे चेअरमन मा. कृष्णकुमार गोयल हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सामाजिक भान असलेला एक दानशूर उद्योगपती अशी त्यांची खरी ओळख आहे. सर्वांना उद्बोधक आणि प्रेरणादायी असे अनुभव त्यांनी त्यांच्या भाषणातून मांडले.

आपले डिस्ट्रिक्ट गव्हर्नर शीतल शहा व फर्स्ट लेडी रागिणी शहा या कार्यक्रमाला उपस्थित होते. शीतल शहा यांनी भारतीय जनतेची गुंतवणुकीबद्दल असलेली मानसिकता यावेळी विशद केली. जगातील लोकांची गुंतवणूक व भारतातील जनतेची गुंतवणूक यांचा तौलानिक विचार त्यांनी मांडला.

मानपत्र, ट्रॉफी आणि शाल देऊन सी. ए. रचना रानडे यांचा सत्कार डि. जी. रो. शीतल शहा, मा. कृष्णकुमार गोयल आणि डिस्ट्रिक्ट व्होकेशनल डायरेक्टर रो. मधुमिता बर्वे या सर्वांच्या हस्ते करण्यात आला.

या कार्यक्रमासाठी होस्ट क्लब हेरिटेज बरोबर इतरही सहा क्लब, रोटरी क्लब पुना, रोटरी क्लब फिनिक्स, रोटरी क्लब पर्वती, रोटरी क्लब युवा, रोटरी क्लब सिनर्जी आणि रोटरी क्लब रॉयल सहभागी झाले होते.

 

रो. मधुमिता बर्वे

डिस्ट्रिक्ट व्होकेशनल डायरेक्टर (2024-25)