योगा स्पर्धा
रोटरी क्लब ऑफ पुणे मिडटाउन तर्फे रविवार दि. १२ जानेवारी २०२५ रोजी 'योगा स्पर्धा' आयोजित करण्यात आली होती. मुलांमुलींमध्ये योग-व्यायाम याविषयी आवड निर्माण व्हावी व त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने ही स्पर्धा भरवण्यात येते. यंदा या स्पर्धेचे हे तिसरे वर्ष होते. सेवासदन शाळा, एरंडवणे, पुणे येथे स.९ ते २.३० या वेळेत गट पहिला - १ ली ते ४ थी,गट दुसरा - ५ ते ७ वी, गट तिसरा - ८ वी ते १२ वी, गट चौथा - ओपन अशा चार गटांमध्ये स्पर्धा घेण्यात आली.
या योगा स्पर्धेत विविध शाळातील अनेक विद्यार्थी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. प्रमुख पाहुणे योगगुरु श्री.अविनाश धस यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. प्रत्येक गटाचे वेळ संपल्यानंतर लगेच त्या गटाचा बक्षीस समारंभ करण्यात आला.
प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक, तृतीय क्रमांक व दोन उत्तेजनार्थ असे प्रत्येक गटासाठी बक्षिसे देण्यात आली. तसेच प्रत्येक सहभागी विद्यार्थ्यास पार्टिसिपेशन सर्टिफिकेट व खाऊ देण्यात आला.
सदर बक्षीस समारंभ प्रमुख पाहुणे श्री.अविनाश धस सर, पी डी जी डॉ.सुधीर राशिनकर, अध्यक्ष रो.अभिजीत म्हसकर व व्ही पी रो. डॉ.शुभदाताई जठार यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
प्रमुख पाहुण्यांनी उपस्थित सहभागी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व पालकांचेही मुलांना पाठिंबा देत असल्याबद्दल कौतुक केले व सर्वांना शुभेच्छा दिल्या. स्पर्धेत सहभागी विद्यार्थी व पालकांनी रोटरीच्या या उपक्रमाबद्दल आनंद व समाधान व्यक्त केले/ कौतुक केले.
या स्पर्धेवेळी पास्ट प्रेसिडेंट्स, रोटेरियन्स,अँन्स,अण्णाज मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सर्वांच्या उत्साही व सक्रिय सहभागामुळेच ही स्पर्धा यशस्वी ठरली.
रोटरी क्लब ऑफ पुना मिडटाऊन
रो. नितीन गद्रे व रो. सुरज पाषाणकर