इंटर डिस्ट्रिक्ट व्होकेशनल टूर
Back
इंटर डिस्ट्रिक्ट व्होकेशनल टूर
डिस्ट्रिक्ट ३१४२
मधील सिनर्जी क्लब मिळून एन.
सी.सी.चे विद्यार्थी यांच्याकरता शौर्य
संविधान व्होकेशनल टुर आयोजित केली होती. आपल्या संविधानाला ७५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल एन. सी. सी मधील ७५ मुलामुलींची ही खास ट्रिप त्यांनी आयोजित केली होती.
त्यामुळे मुलांना भारतीय इतिहास , सैनिकांचे बलिदान, त्यांचा शौर्याचा वारसा व आर्मीच्या कार्याची माहिती मिळाली.
पुण्यातील paraplegic सेंटर आणि वॉर म्युझियम अशा दोन ठिकाणी ही टूर आयोजित केली होती.
ह्या कार्यक्रमाचे नियोजन उत्तम होते.
आपल्या मनोगतामध्ये प्रोजेक्ट चेअर रो. मनीषा कोंडस्कर यांनी आपल्या समाजाभिमुख कल्पना काय आहेत,
तसेच आपल्या डिस्ट्रिक्ट मधून रोटरी कार्य काय केले जाते ह्याचा थोडक्यात लेखाजोगा सांगितला.
डिस्ट्रिक्ट ३१३१ चे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रो.शीतल यांनी मनोगतामध्ये रोटरी आणि आर्मी यांचे विचार एकच असल्याचं नमूद केले. डिस्ट्रिक्ट व्होकेशनल डायरेक्टर मधुमिता व त्याची टीम यावेळी उपस्थित होती.
रो.रवींद्र देशपांडे यांनी एन.सी.सी. बाबत फारच उत्तम माहिती त्यांच्या स्वानुभवातून दिली. त्याचा उपयोग विद्यार्थ्यांना भविष्यात त्यांचे करिअर ठरविताना नक्कीच होईल.
रो.आनी बिजोय यांनी उत्तम निवेदन केले.
अशा प्रकारच्या टुरचे आयोजन सर्व क्लबनी आपल्या इंटरॅक्ट क्लबसाठी करावे असे आवाहन डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रो.शीतल शहा यांनी केलें.
ज्यांच्यामुळे ह्या कार्यक्रमचे नियोजन करता येणे शक्य झाले असे रो.प्रवीण व रो.संदीप यांना धन्यवाद!
डिस्ट्रिक्ट ३१३१ मधील रोटरी मेंबर्सनी आपल्याला शौर्य स्मारक पाहण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल आपल्या डिस्ट्रिक्ट मधील सर्व रोटरी क्लबचे धन्यवाद!
रो.हेमंत पुराणिक
ए.जी.
रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१