रोटरी क्लब ऑफ पुणे सहवास - १०८ वा अथर्वशीर्ष पठण सोहळा
२४ जुलै रोजी क्लबचा १०८ वा अथर्वशीर्ष पठण सोहळा श्री. स्वामीकृपा हॉल येथे प्रसन्न आणि भक्तिमय वातावरणात साजरा झाला.प्रथम श्री. गणेशाला वंदन करून अभिषेक करण्यात आला. पौरोहित्य करणाऱ्या ११ महिलांनी सुस्पष्ट आवाजात मंत्रोच्चार करत यथासांग पूजाविधी आणि अभिषेक केला. सुमारे एक तास चाललेल्या अभिषेकानंतर प्रेसिडेंट रो. निवेदिता मुळे यांनी उपस्थितांचे स्वागत करून क्लबच्या कार्याची माहिती दिली. त्यानंतर श्री. गणपती अथर्वशीर्ष पठणाची अकरा आवर्तने, फलश्रुती, आरती, मंत्रपुष्पांजली, श्रीसूक्त आणि श्री. गणेशाच्या जयघोषाने धार्मिक विधींची सांगता झाली.
या कार्यक्रमास रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ चे प्रांतपाल डी जी. रो. शीतल शहा, एजी रो. पुष्कराज मुळे, पीडीजी रो. प्रमोद जेजुरीकर, पीडीजी रो. रवि धोत्रे आवर्जून उपस्थित होते. त्याचप्रमाणे रो. विद्याधर जाधव, रो. वैशाली वेर्णेकर, रो. जिग्नेश पंड्या, रो. योगेश भिडे, रो. गौरी शिकारपुर, रो. शोभा नहार हे विविध डिस्ट्रिक्ट डायरेक्टर्स उपस्थित होते. डिस्ट्रिक्ट मधील ज्येष्ठ रोटेरियन्स आणि इतर क्लबचे अध्यक्ष यांची लक्षणीय उपस्थिती या कार्यक्रमास लाभली. क्लबचे सर्व आजी व माजी सदस्य आपुलकीच्या भावनेने उपस्थित होते. शहरातील मानाच्या व प्रतिष्ठित गणेश मंडळांचे प्रतिनिधी आणि पुरातन व ऐतिहासिक मंदिरांचे विश्वस्तदेखील उपस्थित होते.
अत्यंत शिस्तबद्ध आणि काटेकोर नियोजन असलेल्या ह्या सोहळ्याची सांगता महाप्रसाद रूपी सुग्रास भोजनाने झाली.
अध्यक्षा रो. निवेदिता मुळे
रोटरी क्लब ऑफ पुणे सहवास
First peace award function of District 3131
Peace and conflict resolution is one of the important avenues of Rotary. Member of Rotary Club of Pune Sahawas and District director of this avenue Rtn.Gauri Shikarpur has initiated a concept of club level peace awards to those who are working for this noble cause.
First peace award function of District 3131 was organized by Rotary club of Pune Sahawas on 19-07-2024. A special program was organised in the club to felicitate and present the award to Captain UlhasBodhankar and Dr. SmitaKulkarni.
Captain Bodhankar's speech on Kargil conflict and Dr. SmitaKulkarni's demonstration of OmkarSadhana for attaining inner peace was really outstanding.
The program was attended by Rtn. GauriShikarpur, a large number of Sahawas club members as well as some non-rotarians too.
President Rtn.Nivedita Mulay
Rotary Club of Pune Sahawas