रोटरी क्लब ऑफ पेण, जीविका फाउंडेशन आणि पंचायत समितीच्या संयुक्त विद्यमाने HPV लसीकरण मोहीम
रोटरी क्लब ऑफ पेण, जीविका फाउंडेशन, मुंबई आणि पेण पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने २८ फेब्रुवारी २०२५ रोजी HPV लसीकरण मोहीम राबविण्यात आली. महिला आरोग्य आणि भविष्यातील सुरक्षितता लक्षात घेऊन आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचा ७४२ विद्यार्थिनींना लाभ झाला.
ही मोहीम पेण नगरपालिका शाळा क्रमांक 2, तसेच जोहे आणि आमटेम येथील शाळांमध्ये मोठ्या उत्साहात पार पडली. गर्भाशय मुखाचा कर्करोग प्रतिबंधक लसीकरण हा मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक महत्त्वाचा टप्पा असून, यासाठी रोटरी क्लब ऑफ पेणने पुढाकार घेत समाजहिताचा एक महत्त्वाचा आदर्श निर्माण केला.
सदर कॅम्प यशस्वी करण्यासाठी पेणमधील सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉ. सोनाली वनगे यांनी महत्वपूर्ण मार्गदर्शन आणि मोलाची मदत केली. त्यांच्या सहकार्यामुळे हा उपक्रम अधिक प्रभावी आणि सुव्यवस्थित पद्धतीने पार पडला.
रोटरी क्लब ऑफ पेणचा हा प्रकल्प मुलींच्या आरोग्य सुरक्षेसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरला असून, भविष्यात अशा उपक्रमांच्या माध्यमातून आरोग्य जागरूकता वाढवण्यासाठी क्लब प्रयत्नशील राहील.
अध्यक्ष रो.संयोगिता टेमघरे
रोटरी क्लब ऑफ पेण