ती - By Rtn Arati Paigude
Back
ती जेंव्हा जेंव्हा जन्मास येते, तेंव्हा अवहेलना सहन करते ।
ती जेंव्हा खेळकर होते, तेंव्हा घरकामात गुंतवली जाते॥
ती जेंव्हा तारूण्यात येते, तेंव्हा बंधनांनी बाधली जाते।
ती जेंव्हा शृंगाराने सजते, तेंव्हा बघणाऱ्यास बेहोश करते॥
ती जेंव्हा अलंकार घालते, वाटते तुम्हास शृंगार करते ।
अरेपण तिलातर विधात्याने, वेसन घालून अडविलेले असते॥
कारण…
तिच्यातच खरी शक्ती असते, म्हणूनच…
मुलगी म्हणून अवहेलना सहन करते, बायको म्हणून सुखदुःख झेलते,
आई होऊन त्यागात झिजते…तरी ही…
ती म्हणून फक्त अपमानीत होते…ती म्हणून फक्त अपमानीत होते…!!