Editor
Rtn. Shubhangi Mulay
March-2025
District Governor
Rtn. Shital Shah

रोटरी क्लब ऑफ पुणे पर्वती Back

एच.आर.संदर्भातले वर्कशॉप

दिनांक १५ फेब्रुवारी रोजी ITI माले (पौड)येथील रोट्रॅक्ट क्लब (जो रोटरी क्लब पर्वती ने स्थापन केला आहे ) येथे H.R.संदर्भात एक वर्कशाॅप अयोजित केले होते.डिस्ट्रिक्टचे RCC सेक्रेटरी आनंद कुलकर्णी यांनी ही कार्यशाळा घेतली.

 सर्व प्रथम त्यांनी मुलांना बोलते करून त्यांना खेळीमेळीच्या वातावरणात आणले.प्रत्येक विद्यार्थ्याने आपले नाव व तो शिकत असलेला ट्रेड सांगितला.त्यानंतर आनंदने त्यांना त्यांच्या मित्रांचा छूपा गुण जो परिचयात दिसला नाही,त्या बद्दल बोलायला सांगितले. मुलांनी आपापल्या मित्रांचे छूपे गुण  सांगताच हास्याची कारंजी उडून  वातावरण एकदम मोकळे झाले. हा टिम बिल्डींगचा एक भाग होता.

 आनंदने आई,वडील, शिक्षक ह्यांच्यानंतर चौथा गुरू म्हणजे तुमचा श्वास, ह्या श्वासावर लक्ष ठेवून नियंत्रण ठेवले म्हणजे तुमचा आत्मविश्वास वाढून जिवनात यशस्वी होता येईल असे सांगितले.

नंतर संघ (टीम) वर्कच्या प्रात्यक्षिकेसाठी आनंदने तीन टीम(संघ) ) तयार करून मैदानात आणले.

 एका टीमने फुग्याच्या खेळात ज्याचा फुगा फुटणार नाही तो विजेता असे सांगताच प्रत्येकाने एकमेकांचे फुगे फोडले.इथे फुगे तसेच घेउन आले असते तर सर्वजण विजेते झाले असते. पण इर्षेपोटी एकमेकांना पुढे येउ दिले नाही,जे संघ बांधणीसाठी आवश्यक असते. ही पहिली शिकवण आनंदने दिली.

दुसरी टीम बाॅल आणायला पळाली. इथे यांनी शक्ती वाया घालवली व अकारण दमले. हेच जर हाताच्या अंतराने उभे राहून बाॅल पास करीत राहिले असते तर वेळ आणि उर्जा वाचली असती. ही टीमवर्कची दूसरी शिकवणी होती.

 मैदानाच्या रिंगणात क्रमाने नसलेल्या आणि निरनिराळ्या विखूरलेल्या नंबरांवर क्रमाक्रमाने उड्या मारायच्या होत्या,  जे एकट्या माणसाला शक्य नव्हते. इथेपण टीम बिल्डिंग आवश्यक होती.

ह्या तीन खेळांनी आनंदने ITIच्या विद्यार्थ्यांना सांघिक कार्य (टीम वर्क)चे महत्व पटवून दिले.

 यानंतर ताम्हिणी रस्त्यावर असलेल्या कातकरी आदिवासी पाड्याला क्लब ने भेट दिली. जेमतेम दोन तास नळाला पाणी येणार्‍या या पाड्याला पाण्यासाठी साठवण टाकीची गरज आहे , RCC कडून हे काम होणे अपेक्षित आहे .टाकीचा खर्च P.P.हेमंत खिरे स्वत: करणार आहेत.

ताम्हिणी गावात असलेल्या शाळेला भेट दिल्यानंतर कळले की सातवीपर्यंत असलेल्या  या शाळेत बक्षिसे आणि ट्राॅफी ठेवायला शोकेस सुध्दा नाही.शहरी शाळांच्या तुलनेत येथे सुविधा नाहीत. पण शिक्षकांची मुलांना शिकविण्याची जिद्द व तळमळ उल्लेखनिय आहे.त्यांनी शाळेला लागणार्‍या वस्तुंची यादी पत्राद्बारे  दिली.ती RCC चे District Secretary आनंद व प्रेसिडेंट वृषाली खिरे यांनी स्विकारली आहे. लवकरच त्यांना मदत मिळेल.

पुण्यातील मूक-बधिर मुलांची आंतरशालेय क्रिकेट स्पर्धा

पुण्यातील मूक-बधिर मुलांच्या आंतरशालेय क्रिकेट स्पर्धांचे आयोजन रोटरी क्लब पुणे पर्वती आणि शि. प्र. मंडळीच्या वि. रा. रुईया मूकबधिर विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने एस. पी. कॉलेजच्या मैदानावर शुक्रवार, दिनांक २१ फेब्रुवारी  रोजी झाले. पुण्यातील नऊ शाळांमधील कर्णबधिर  विद्यार्थ्यांनी यात भाग घेतला व संघांमध्ये मुलींचा ही समावेश केला गेला आहे. स्पर्धेचे उदघाटन माननीय श्री. प्रवीण पुरी, आयुक्त, दिव्यांग कल्याण महाराष्ट्र राज्य आणि प्रसिद्ध माजी रणजी क्रिकेटपटू माननीय श्री. रणजीत खिरीड यांच्या हस्ते झाले. स्पर्धेचे उदघाटन शि. प्र. मंडळीचे नियामक मंडळाचे अध्यक्ष माननीय ॲड. सोहनलालजी जैन आणि रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१चे प्रांतपाल शितल शहा यांच्या उपस्थितीत झाले.

रोटरी क्लब ऑफ पुणे पर्वतीच्या अध्यक्षा रो.वृषाली खिरे, व क्लबचे इतर सदस्य तसेच रुईया विद्यालयाच्या सौ.संगीता शिंदे ह्या स्पर्धेकरता उपस्थित होते.

The Power of Rotary in Action! 🩸❤️”

On 25th February Rotary Club of  Pune Parvati with Jankalyan blood bank organised a  huge blood donation camp at KPMG. 80 blood bags were collected and 80% donars were women.

With dedication and teamwork, blood donation camps across all cities started in time, proving once again the incredible impact of Rotary! When we come together, lives are saved, and communities grow stronger.

This blood donation camp was fully arranged by IPP Rtn.Swanand Samudra.

A heartfelt thank you to all the donors, volunteers, and organizers for making this mission a success. This is the power of Rotary—serving humanity, one drop at a time!

अध्यक्ष रो. वृषाली खिरे

रोटरी क्लब ऑफ पुणे पर्वती


सर्वासाठी आरोग्य सर्वांसाठी तंदुरुस्ती

रोटरी क्लब पुणे पर्वतीच्या वतीने 'सर्वांसाठी आरोग्य सर्वांसाठी तंदुरुस्ती' ह्या विषयावर डॉ. प्रमोद पाटील( एमडी) यांची सहा सत्रं आयोजित करण्यात आली आहेत. त्यातील दुसरे सत्रं सांधेदुखी, पोश्चर व आजार यावर २६ फेब्रुवारी रोजी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल येथे पार पडले. ११० लोकांनी याचा लाभ घेतला. नागरिकांचा अतिशय उत्तम प्रतिसाद होता व  असे कार्यक्रम कायम असावेत अशी मागणी त्यांनी केली. या वेळी रोटरीची प्रार्थमिक माहिती सांगितल्यामुळे रोटरीच्या कार्याचे महत्व परत एकदा अधोरेखित केलं गेलं.

रो. रंजना बर्वे

रोटरी क्लब ऑफ पुणे पर्वती