२३ऑगस्ट रोजी देलवडी गांवात रोटरी क्लब ऑफ पुणे शिवाजीनगरचा वृक्षारोपणाचा प्रकल्प खूप छान झाला. सुरेख सजलेल्या मुली, पालखीत रोपं, ढोलकीच्या तालावर घोषणा देत चाललेल्या मुलांच्या रांगा, जोडीने शाळेचे शिक्षक आणि रोटेरियन्स अशा थाटात दिंडी शाळेतून निघून आईच्या वनात पोचली. तिथे आधीच १०० औषधी झाडं पोचली होती. क्लबच्या अध्यक्षा डाॅ. भारती व इतर सदस्यांच्या व शिक्षकांच्या हस्ते वृक्षारोपण झाले.
देलवडी गावातील गावकऱ्यांनी करोना काळात एकत्र येऊन लोकसहभागातून ६०० झाडांचे आईचे वन उभे करायला घेतले. नुकतेच त्यांनी आईचे वन फेज २ सुरू केले व त्यात शिवाजीनगर क्लबने १०० औषधी झाडं दिली व झाडांना पाणी घालण्याची व्यवस्था करणारी यंत्रणा उभी करायला आर्थिक मदत पण केली. लोकसहभागातून उभी राहिलेली कामं नेहमीच शाश्वत असतात. ह्या प्रकल्पाला अध्यक्ष डाॅ भारती, डायरेक्टर कम्युनिटी सर्व्हिस वृंदा वाळिंबे व क्लबचे इतर सदस्य देखील उपस्थित होते. खूप समाधानकारक दिवस होता.
वृंदा वाळिंबे
रोटरी क्लब ऑफ पुणे शिवाजीनगर
डायरेक्टर,कम्युनिटी सर्व्हिस नाॅन मेडिकल