रोटरीचे इंद्रधनु
१६ सप्टेंबर २०२४ रोजी रोटरीच्या इतिहासात प्रथमच रोटरीचे इंद्रधनू हा कार्यक्रम पुणे फेस्टिवलच्या अंतर्गत बालगंधर्व इथे सादर करण्यात आला.
यात रोटरी मधील सभासद आणि त्यांचे कुटुंबीय यांचे विविध गुणदर्शन सादर करण्यात आले.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून मा. श्री. कृष्णकुमारजी गोयल, श्री अभयजी छाजेड यांच्यासह आपले डीजी रो. शीतल शहा आणि फर्स्टलेडी रो.रागिणी शहा व डिस्ट्रिक्ट मधील इतर मान्यवर देखील उपस्थित होते.
डिस्ट्रिक्ट कलचरल टीमने याचे आयोजन केले होते आणि लवकरच म्हणजे २१ ऑक्टोबर २०२४ रोजी रात्री ९ वाजता यशवंतराव चव्हाण नाट्यगृह इथे रोटरीचे इंद्रधनू part 2 सादर होणार आहे.
कार्यक्रमासाठी RC पिंपरी, RCP शिवाजीनगर आणि RCP सहवास हे होस्ट क्लब असून RC नारायणगाव,RC पिंपरी Elite, RCP westside , RC चिंचवड आणि RC नांदेडसीटी हे Co होस्ट होते.
कार्यक्रमात पुण्याबरोबरच शिक्रापूर, भिगवण, तळेगाव,पनवेल,जुन्नर असे बाहेरगावतील क्लब्सनेही यात सहभाग घेतला होता.
रो.वैशाली वर्णेकर
डायरेक्टर, डिस्ट्रिक्ट कल्चरल कमिटी