रोटरी क्लब ऑफ पुणे सहवास तर्फे इंद्रायणी बालिकाश्रम समिती न्यास या संस्थेमधे विशेष प्रकल्प
Back
रोटरी क्लब ऑफ पुणे सहवास तर्फे दरवर्षी केला जाणारा प्रोजेक्ट म्हणजे तळेगाव येथील इंद्रायणी बालिकाश्रम समिती न्यास या मुलींच्या शिक्षणाची सोय व्हावी म्हणून चालविल्या जाणाऱ्या संस्थेला आज आपण भेट दिली. चार्टर्ड प्रेसिडेंट रोटेरियन शेखर जी टाकळकर यांच्या पुढाकारामधून दरवर्षी या संस्थेला अन्नधान्य.. कपडे.. सॅनिटरी नॅपकिन्स... किराणा... अत्यावश्यक गोष्टी.... तसेच मेंबर्सच्या सहभागातून आर्थिक मदत दिली जाते. तसेच सहवास क्लबच्या माध्यमातून देखील आपण देणगी देतो. ज्या मुलींच्या शिक्षणाची सोय त्यांच्या गावात नाही अशा मुलींसाठी येथे वसतिगृहात राहण्याची सोय केली जाते. यावर्षी येथे 35 मुली आहेत. वेगवेगळ्या शैक्षणिक इयत्ता मध्ये असलेल्या या मुली जवळच्या शाळेत जातात आणि वसतिगृहामध्ये त्यांच्या जेवणाची आणि राहण्याची विना मोबदला सोय केली जाते. ज्यांच्या पालकांना मुलींची फी भरणं शक्य नाही अशा मुलींची फी देखील संस्थेमार्फत भरली जाते. येथील व्यवस्थापिका भुतकर मॅडम या मुलींवरती सुंदर संस्कार... शिस्त... आणि त्यांचा अभ्यास रोजचे त्यांचे रुटीन यावरती प्रेमळ देखरेख करतात. संस्थापक श्री देशपांडे यांनी शाळेच्या कामकाजाची सविस्तर माहिती दिली. श्री पत्की यांनी लोकांच्या सहभागातून ही संस्था कशी चालते हे सांगितले. संस्थेला भरपूर मदत मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले. मुलींसाठी वेगवेगळे अवांतर वर्ग घेण्याची गरज त्यांनी बोलून दाखवली. आपल्या सर्व उत्साही अँन्स नी याला लगेच दुजोरा दिला. आज आपण त्यांना किराणा.... कडधान्य... तेलाचा डबा.... तसेच कॅश अशी रुपये 45 हजार मदत केली. जयश्री धुपकर यांनी मुलींना बस्तर या नक्षलवादी भागामध्ये चालविल्या जाणाऱ्या मुलींच्या शाळेची सविस्तर माहिती दिली. मुलींमधील शिस्त हे वाखाणण्याजोगी होती. ज्या मुली स्वतःच्या शिक्षणासाठी घरापासून कुटुंबापासून लांब राहतात यातूनच त्यांची शिकण्याची जिद्द लक्षात येते. रोटरी क्लब ऑफ पुणे सहवास च्या अध्यक्ष रोटेरियन प्रतिभा जगदाळे यांनी मुलींना रोटरी मार्फत पुढील शिक्षणाच्या उपलब्ध असलेल्या संधी बद्दल माहिती दिली. जेव्हा मुली येथून शिकून बाहेर पडतील तेव्हा त्यांनी देखील इतर मुलींच्या शिक्षणासाठी संस्थेला मदत केली पाहिजे ही गरज अधोरेखित केली. मुली अतिशय संयमाने सर्व गोष्टी आत्मसात करत होत्या. मुलींनी सुंदर प्रार्थना म्हटली . सर्व सदस्यांच्या जेवणाची सोय संस्थेमार्फत केली होती. अशा पद्धतीने आजचा दिवस तळेगाव येथील इंद्रायणी बालिकाश्रम समिती न्यास या संस्थेमध्ये सुंदर रित्या गेला.
ज्या सर्व सहवासीय सदस्यांनी मदत दिली त्या सर्वांना खूप खूप मनःपूर्वक धन्यवाद आणि आभार.