आशा सेविकांना बाल आरोग्याविषयी मार्गदर्शन
दिनांक ६ जानेवारी २०२५ रोजी रोटरी जिल्हा स्तरीय प्रकल्पाच्या माता आणि बाल कल्याण आरोग्याअंतर्गत 'आशा एक किरण' या उपक्रमातून भोर तालुक्यातील आशा सेविका आणि अंगणवाडी सेविकांचे सशक्तीकरण आणि प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन रोटरी क्लब ऑफ भोर राजगड यांच्या मदतीने व रोटरी क्लब ऑफ पुणे सहवास , रोटरी क्लब ऑफ पुणे वेस्टसाइड, रोटरी क्लब ऑफ पुणे सारसबाग, रोटरी क्लब ऑफ सिनर्जी, रोटरी क्लब ऑफ पुणे वारजे, रोटरी क्लब ऑफ प्राधिकरण पुणे या सहा क्लबच्या च्या साहाय्याने भोर उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आले होते.
यावेळी भारती हॉस्पिटल पुणे येथील डॉ . मंजू तलाठी, डॉ .सुधांशु महाजन, डॉ . सोनाली पालकर यांनी माता आणि बाल आरोग्या विषयी मार्गदर्शन केले. भारती हॉस्पिटलद्वारे समर्थित या प्रशिक्षणात बाळाची अंघोळ, सर्दी, बाळसे, औषधे, तापमान, स्तनपान, भूक, पूरक आहार, वाढ, लसीकरण अशा अनेक विषयांच्या संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी ४०० अंगणवाडी सेविका व आशा सेविका कार्यशाळेसाठी उपस्थित होत्या.
याप्रसंगी रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ ने आशा सेविकांसाठी तयार केलेल्या मार्गदर्शन पुस्तिकेचे वाटप करण्यात आले. ह्या कार्यशाळेसाठी माता बालसंगोपन संचालक रो.शोभा नहार यांची मोलाची मदत झाली.
प्रशिक्षण कार्यशाळा उद्घाटन प्रसंगी रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ चे प्रांतपाल रो. शीतल शाह, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. जयदीपकुमार कापसीकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. आनंद साबणे, भोरचे बालविकास प्रकल्प अधिकारी धनराज गिराम, माता बालसंगोपन संचालक रो. शोभा नहार उपस्थित होते. तसेच सहभागी क्लबसचे अध्यक्ष रो. डॉ. रुपाली मेहेत्रे. रो. संजय शिंदे. रो. डिम्पल धोत्रे, रो. अमित ठाकूर व रो. निवेदिता मुळे हे देखील उपस्थित होते.
ज्येष्ठ नागरिकांसाठी अनोखा कार्यक्रम
रोटरी क्लब ऑफ पुणे सहवास ने ११ व १२ जानेवारी २०२५ रोजी हॅपी कॉलनी व डहाणूकर कॉलनी तील ज्येष्ठ नागरिक संघासाठी दोन दिवसांचा एक अनोखा कार्यक्रम आयोजित केला होता.
११ जानेवारी रोजी बुलढाणा अर्बन क्रेडिट कॉ-ऑप सोसायटीचे सीईओ श्री. शिरीष देशपांडे यांच्या हस्ते आपण 'स्नेहधाम' च्या संचालिका डॉ. सविता नाईकनवरे यांना Service Excellence Award ने पुरस्कृत केले. त्या दिवशी प्रमुख वक्ते म्हणून श्री. अभिजित जोग यांना आमंत्रित केले होते. त्यांनी 'भारताच्या इतिहासातील दिशाभूल' ह्या विषयावर खूप सुंदर व्याख्यान दिले.
दुसरा दिवस, १२ जानेवारी, रोटरी क्लब ऑफ पुणे सहवास च्या कलाकारांनी गाजवला. रो. गौरी शिकारपूर ह्यांनी 'संगीतानुभूती' ह्या सादरीकरणातून खूपच सुंदर अनुभूती दिली. चार विविध गाण्यांचा अध्यात्माकडे नेणारा अर्थ त्यांनी अतिशय ओघवत्या भाषेत उलगडून दाखवला.
रो. राहुल व तारीणी लाळे यांनी 'शतजन्म शोधताना - संगीत सूर्य डॉ. वसंतराव देशपांडे' या विषयावरील दृक श्राव्य कार्यक्रम खूपच प्रभावी पणे सादर केला.
आपले Senior Chartered President रो. शेखर टाकळकर यांनी पण एक छान विडंबनात्मक कविता सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली.
तसेच ॲन धनश्रीने कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी उत्तम रित्या सांभाळली.
ह्या सर्व कार्यक्रमाच्या आयोजनासाठी शिकारपूर फौंडेशनचे साहाय्य मिळाले. हा असा वेगळा पण छान संकल्पना असलेला कार्यक्रम रोटरी क्लब ऑफ पुणे सहवासने उत्तम नियोजनाने यशस्वी केला.
अध्यक्ष रो. निवेदिता मुळे
रोटरी क्लब ऑफ पुणे सहवास