Editor
Rtn. Shubhangi Mulay
March-2025
District Governor
Rtn. Shital Shah

WASH (Water, Sanitation, Hygiene) Back

पाणी, सांडपाणी,आरोग्य

समस्या शहरी असो की ग्रामीण बहुतेक त्या सर्वांचे मूळ 'पाणी प्रश्नात' असते. पाणीटंचाई ,पाणी प्रदूषण, नदी नाल्यांचे पूर  या आणि अशा पाणी समस्यांमुळे आरोग्य, शिक्षण ,आर्थिक प्रगती, सामाजिक शांतता,(हे सगळे रोटरीचे फोकस एरीया) संस्कृतीचा र्‍हास  हे सगळे प्रश्न निर्माण होतात. त्यामुळेच 'पाणी विषय' प्रश्नांना उत्तरे आणि पर्याय तयार केले तर वरील सर्व सामाजिक प्रश्नांच्या सोडवणुकीला चालना मिळते. त्यामुळे आपण सर्व रोटरी क्लब्जनी  पाणी विषयक  प्रकल्प  करायलाच हवेत.

दरवर्षीच  जगभरातील रोटरी क्लबज पाणी विषयक कोट्यावधी रुपयांचे प्रकल्प करत असतातच, त्याला आपल्या डिस्ट्रीक्टचे क्लब्ज कसे बर अपवाद असतील. या रोटरी वर्षात आपल्या डिस्ट्रिक्टमधील चार क्लबजने बोअरवेल रिचार्ज प्रकल्प ९० पेक्षा अधिक गावात करून त्या वाडी वस्त्यांना, तेथील जनावरांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले आहे, अजूनही वर्ष संपेपर्यंत ही संख्या २०० चा आकडा सहज पार करेल. चार पाच  क्लबजनी एकत्र येवून  भोर व मुळशी तालुक्यातील सहा गावांमध्ये कुंड प्रकल्ही राबवून सह्याद्रीच्या रांगांमधील दुर्गम भागातील वाड्यावर त्यांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले आहे. दुर्गम ग्रामिण भागात शेकडो वनराई बंधारे बांधून शेतीसाठी पाणी उपलब्ध केले आहे. 

याबरोबरच दहा क्लबजने दहा गावांसाठी डिजिटल वॉटर मॅनेजमेंट या प्रकल्पासाठी पुढाकार घेतला आहे. पाण्याचे सर्व प्रकारचे व्यवस्थापन करण्यासाठी विविध ॲप उपलब्ध आहेत.या विषयी पुणे जिल्ह्यातील  पाच  कॉलेजेस आणि पाच शाळांमधल्या एकूण तिनशे पेक्षा अधिक  मुलामुलींना   प्रशिक्षण देऊन त्यात नियोजन व व्यवस्थापन  कण्यासाठी  सक्षम करण्याचा  प्रकल्प ऑगस्ट २४ ते मार्च २५ पर्यंत राबवण्यात आला. यात सरफेस वॉटर व ग्राउंड वॉटर मॅनेजमेंट तर आहेच पण त्याचबरोबर पिण्याचे पाणी, शेतीचे पाणी यांच्या गुणवत्तेबाबत या मुलांना प्रशिक्षण दिले गेले. याबरोबरच हवामान आणि हवामान आधारित विविध माहिती मुलांना देण्यात आलेली आहे. यासाठी प्रत्येक शाळा व काॅलेजेसला चाळीस हजार रुपयांचे साहित्यही रोटरीकडून मुलांना देण्यात आलेले आहे.  लवकरच त्यांनी केलेल्या कामाबाबत ते सादरीकरण करणार आहेत. त्यावर आधारित त्यांच्या कामाचे मूल्यमापन करून  बक्षीस समारंभ करणार आहोत. यात भाग घेतलेले क्लब पुढील प्रमाणे आहेत.

.रोटरी क्लब ऑफ

१. पुणे सिंहगड रोड

२.अमानोरा

३.साउथ

४.सारसबाग

५.विस्डम

६.एन आय बी..एम

७.पिंपरी

८.पिंपरी उद्योगनगरी

९. पुणे सेंट्रल

१०.पुना वेस्ट

 

चला तर मग 'पाणी विषयक' प्रकल्पांमध्ये सर्व क्लबज सहभागी व्हा आणि उत्तम समाज निर्माण करण्यात हातभार लावा.

 
रो.सतीश खाडे

डायरेक्टर, वॉश (२०२४ - २५)