पारिजात
रात्र सरली , पहाट झाली
रातराणीचा सुगंध निवळला
सकाळ न्हाहून निघाली
प्राजक्ताच्या सड्याने .
झुळूक वार्याची येता
उमलला पारिजात पानोपानी
सवे तुझा असल्याने
नित्याची येई बहार जीवनी
आजही तुझ्या नावाने फुलतो
माझ्या अंगणात पारिजात
कविता लिहिताना मात्र
कागदच दरवळतो
पानांतून मनाच्या
हलकेसे हे शहारे
सुगंध पसरवीत
वाहतात प्रेमाचे वारे
कोवळ्या किरणाने
सुखावून गेली ती फुले
गुपचूप उमलताना
त्यानेच प्रेमाचे गुपित उलगडले
रो.विलास रवंदे
डिस्ट्रिक्ट डायरेक्टर क्लब ऍडमिनिस्ट्रेशन