गाथा शिक्षणाची
काय सांगू आता शिक्षणाची गाथा
त्यानेच होतात दूर साऱ्या व्यथा
वसुधैव कुटुंबकम शिक्षणच सांगते
संघर्ष संपून शांती प्रस्थापित होते
आरोग्याची काळजी घेणे शिक्षणच शिकविते
बाळाच्या आरोग्याचे तंत्र-मंत्र शिक्षित मातेलाच समजते
अज्ञानानेच पाण्याची अवहेलना होते
पाण्यासम आयुष्य व्यर्थ जाते
शिक्षणामुळेच होते समाजाची उन्नती
सरस्वती सवे लक्ष्मी, धरोनी हात हाती
म्हणूनच करावे समाजाला शिक्षित
रोटरीच्या यशाचे हेच खरे इप्सीत
शिक्षक प्रशिक्षण करून, करा त्यांना तज्ञ
मुलांना तंत्र शिक्षण देऊन दूर करा त्यांचे अज्ञ
प्रौढांना शिक्षित करून द्या सन्मानाचे आयुष्य
मुलींनाही शिक्षण देऊन घडवा त्यांचे भविष्य
शाळा करा आधुनिक देखण्या
आनंद वाटेल मग तेथे बालकांना शिकण्या
रो.प्रा. ममता कोल्हटकर
रोटरी क्लब ऑफ पुणे डेक्कन जिमखाना
मेंटॉर :- हॅपीस्कूल (२०२४ - २०२५ )