खास स्वातंत्र्यदिनाकरता ! जयहिंद, जय भारत.
माझा देश -
माझ्या देशाच्या संस्कृतीचे मधूर तराणे
रामायण महाभारत वेद पुराणे
मस्तकी हिमालयाचा मुकुट शोभतो
विशाल सागर चरण त्याचे धूतो
शिल्पकला, हस्तकला, प्रसिध्द व्यापार
नालंदा विश्वविद्यालय ज्ञानाचे भांडार
वेरूळ अजिंठाची थोरवी गातात सारे
कोणार्क मंदिरासम नाही जगात दुसरे
आयुर्वेद माझ्या देशाची शान
योगविद्येचा चमत्कार महान
माझ्या देशाच्या तंत्रज्ञानाचा वारसा महान
तळपदेच्या विमानाचा जगात पहिला मान
अशा या देशाला इंग्रजांचा वेढा
एकजुटीने दिला त्यांसी लढा
परकीय जोखडातून मुक्तता केली
जनतेच्या राज्याची स्थापना केली
सगळ्यात मोठा लोकशाही उत्सव
सूज्ञ जनता अन निवडणूक महोत्सव
उन्नत शिखरी माझा देश गेला
जगात त्याचा नावलौकिक झाला
मंगलयानाने सारे मंगलमय झाले
अनेक उपग्रह अवकाशात सोडले
चंद्रावर प्रज्ञान रोव्हर उतरविले
सूर्यावर आदित्ययान झेपावले
प्रणाम देशाच्या सैनिकां शूरा
पाहुनी त्यासी शत्रू कापे थराथरा
फुलबागेसम सुंदर माझा देश
प्रत्येक राज्याची भिन्न संस्कृती अन वेष
असा माझा देश महान
कोटी कोटी त्यास प्रणाम
रो.प्रा.ममता कोल्हटकर
रोटरी क्लब ऑफ पुणे डेक्कन जिमखाना
मेंटॉर :- हॅपी स्कूल (२०२४ - २०२५)