लिटरसी लीग
डिस्ट्रिक्ट ३१३१ आयोजित लिटरसी सेमिनार २१ सप्टेंबर रोजी BNCA हॉल कर्वे शिक्षण संस्था इथे आयोजित करण्यात आला होता.रोटरी क्लब्स प्रोजेक्ट्सच्या मार्फत शिक्षण क्षेत्रात काम करतच असतात, पण काही लोक असे ही आहेत ज्यांनी शिक्षण क्षेत्रात अमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी आपले जीवन समर्पित केले आहे. या कार्यक्रमला मा.आमदार चंद्रकांत दादा पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.उच्च शिक्षण राज्यमंत्री या नात्याने त्यांनी मार्गदर्शन केले.त्यांच्या भाषणत त्यांनी शिक्षण हें मातृभाषेत देण्यासाठी सरकारच्या उपक्रमाची माहिती दिली.
आईसर या भारतातील अग्रगण्य मानल्या जाणाऱ्या संशोधन संस्थेच्या मूलभूत उभारणीत ज्यांचा मोलाचा वाटा आहे व उत्तम दर्जाचे शिक्षण देण्यासाठी काम करणारे अभ्यासक मा. अरविंदजी नातू यांनी शिक्षण क्षेत्रात अपॆक्षित असणाऱ्या बदलावार प्रकाश टाकला आणि प्रेक्षकांना मंत्रामुग्ध केले.
डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रो. शीतल शहा यांनी अतिशय मार्मिक भाषेत रोटरी इंटरनॅशनल लिटरसी मिशनच्या अंतर्गत जगभरात चालणारे रोटरीचे काम अधोरेखित करत आपल्या डिस्ट्रिक्टच्या योगदानावर प्रकाश टाकला. नेहमीप्रमाणे त्यांनी सर्वाना प्रोत्साहन देत शुभेच्छा दिल्या.
मा. सुधाकरराव जाधवार डायरेक्टर
जाधवार एडुकेशनल इन्स्टिटयूट यांची विशेष उपस्थिती या कार्यक्रमांमध्ये होती.
या सेमिनार मध्ये नेशन बिल्डर अवॉर्ड म्हणून तीन शिक्षकांचा गौरव करण्यात आला. -
1.रो. शिल्पागौरी गणपुले.
राष्ट्रपती पदक पुरस्कार 2024.
2.रो.शामल मराठे
इंजिनीरिंगग व शास्त्र शिक्षक.
3.सौ. पल्लवी राऊत
माध्यमिक शिक्षक.
TEACH या प्रोग्रॅम मध्ये काम करणाऱ्या सामाजिक संस्थांना आपण आमंत्रित करून त्यांच्या कामाचा आढावा व माहिती,चर्चासत्रातून करून घेतली व त्यांच्या कार्यचा गौरव केला.
1.मा. प्राजक्ता रुद्रवार
सहगामिनी फौंडेशन
प्राजक्ताजीं सारख्या काही रणरागिणी आहेत ज्या बांधकाम कामगांरच्या मुलांसाठी शाळा चालवतात किंवा त्यांना शाळेत प्रवेश मिळवून देतात.
2.मा. शीतल बापट
श्यामची आई फौंडेशन
मा नरेंद्र मोदी यांच्या विचारांनी प्रेरित होऊन शिक्षण क्षेत्र हें एक उत्तम समाज घडवण्यासाठी योग्य क्षेत्र मानून शिक्षक प्रशिक्षण हाच मापदंड मानून अतिशय शिस्तबद्ध व नियोजन युक्त काम करून, नवीन शिक्षण पद्धती आचरणात आणणारी शिक्षकांची एक फळीच निर्माण करणाऱ्या देश सेविका.
3.मा. प्रमोद जेजुरीकर
२०११ पासून शिक्षण क्षेत्रात होणारे बदल याचा अचूक वेध घेऊन आपल्या गव्हर्नरशिप काळात भारतात डिजिटल तंत्रज्ञानाचा सहभाग रोटरी मार्फत शिक्षण प्रणालीत करणारे व आज ही त्याच तळमळीने काम करणारे रोटरीयन.
4.मा. अशोक जोशी.
आदिम फौंडेशन
पुणे जिल्ह्यातील वाड्यावस्तींवरील अशिक्षित वाडवडिलांना, आई आज्जीना, आपल्या योगदानातून अक्षर ओळख तसेच प्रौढ शिक्षण देणारी व यासाठी अविरत काम करणारी संस्था. चालक कित्येक अडचणीत येत असतील पण त्यावर मात करून आपली ध्येयप्राप्ती करणारे ध्येयवेडे कार्यकर्ते.
5.श्री. संतोष परदेशीं व सौं. स्मिता कुलकर्णी
स्मित फौंडेशन
दिव्यांग मुलांच्या विशेष गरजा ओळखून त्यांना व त्यांच्या पालकांचे सामाजिक, मानसिक व शाररिक स्तरावर पुनर्वसन करण्यासाठी झपाटून काम करणारी संस्था.
होस्ट क्लब प्रेसिडेंट रो. शंतनू जोशी यांनी रोटरी क्लब ऑफ पुणे शनिवारवाड्याची ३४ वर्षांची वाटचाल सादर केली.
रो संतोष परदेशीं यांनी डिस्ट्रिक्ट ३१३१ च्या बेसिक एडुकेशन अँड लिटरसीच्या कामाचा आढावा घेतला.
रो अंनत तिकोने यांनी डिस्ट्रिक्ट ३१३१ च्या हॅपी स्कूलच्या कामाचा आढावा घेतला.
या कार्यक्रमात रोटरी की स्मार्ट पाठशाला व हॅपी स्कूल या प्रोग्रॅम मध्ये सहभागी होऊन काम करणाऱ्या रोटरी क्लबला पुरस्कार देण्यात आले व सहभागी क्लब्सचा देखील सत्कार करण्यात आला. सेमिनार मध्ये लकी ड्रॉ ने मजा आणली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोटरी क्लब ऑफ पुणे फिनिक्सच्या रो.मधुर डोलारे आणि रोटरी क्लब पुणे विस्डमच्या रो. स्वाती यादव या दोघींनी अतिशय रंजक पद्धतीने केले. शेवटी अतिशय सुंदर भाषेत डॉ. कंक यांनी आभार मानले व सुग्रास भोजनाने सेमिनारचा समरोप करण्यात आला.
या कार्यक्रमाकरताचा होस्ट क्लब खालील प्रमाणे
१) रोटरी क्लब ऑफ पुणे शनिवारवाडा
को- होस्ट क्लब्स
२) रोटरी क्लब ऑफ पुणे लोकमान्यनगर
३) रोटरी क्लब ऑफ पुणे विस्डम
४) रोटरी क्लब ऑफ भोर राजगड
५) रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसी
६) रोटरी क्लब ऑफ पुणे नांदेड सिटी
७) रोटरी क्लब ऑफ पुणे ई डायमंड
८) रोटरी क्लब ऑफ पिंपरी
९) रोटरी क्लब ऑफ पिंपरी इलाईट
१०) रोटरी क्लब ऑफ पुणे कोथरूड
११) रोटरी क्लब ऑफ भिगवण
रो. संतोष परदेशी
डिस्ट्रिक्ट डायरेक्टर, बेसिक एज्युकेशन अँड लिटरेसी