Editor
Rtn. Shubhangi Mulay
October-2024
District Governor
Rtn. Shital Shah

Rotary Club of Pune Gandhi bhavan Back
सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कार

२१ सप्टेंबर रोजी रोटरी क्लब ऑफ पुणे गांधी भवनच्या वतीने कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालयातील सफाई कामगारांचा सन्मान करण्यात आला. गणेशोत्सवात अविरत मेहनत घेत परिसर स्वच्छ राखल्याची जाणं ठेवून, कर्तव्य तत्पर कामगारांना गौरविण्यात आले.शहरातील कचरा उचलणाऱ्या सुमारे ३५ सफाई कामगारांचा शाल आणि 'सफाई दूत' असं मेडल देऊन सन्मान करण्यात आला.
सतत कचरा, घाणीत काम केल्यामुळे त्यांचे आरोग्याचे ही बरेच प्रश्न असतात, या गोष्टीकडे त्यांनी लक्ष वेधले.
या सत्कारामुळे त्यांनी भारावून गेल्याची भावना व्यक्त केली. तसेच समाजानी त्यांना सन्मानाची वागणूक द्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली.
सदर सत्काराला उत्तर देताना महानगरपालिकेचे मुकादम वैजीनाथ गायकवाड यांनी स्वच्छता ही सेवा तसेच १४ सप्टेबर ते २ आक्टोबर २०२४ पर्यंतच्या स्वच्छता पंधरवडयाच्या अनेक स्वच्छता उपक्रमात व स्वच्छ भारत अभियान, स्वच्छ सर्वेक्षण मिशन २०२४ मध्ये पुणे शहराला नंबर १ आणण्यासाठी स्वयंसेवी संस्थांनी व नागरिकांनी सहभागी व्हावे व सहकार्य करावे असे आवाहन केले.
याप्रसंगी उपस्थितांनी स्वच्छतेची शपथ घेतली.क्लबकडून झालेल्या या सत्कारामुळे सफाई कामगारांना मिळालेलं समाधान खूप महत्त्वाचं आहे अशी भावना क्लबच्या वतीने प्रेसिडेंट रो. मीनल धोत्रे यांनी व्यक्त केली.
या प्रसंगी रोटरी क्लब ऑफ पुणे गांधी भवनचे अनेक सदस्य उपस्थित होते.

प्रेसिडेंट रो. मीनल धोत्रे
रोटरी क्लब ऑफ पुणे गांधी भवन