लतादीदी
होती सुरेल बासरी
केले मंत्रमुग्ध तिने
वेड लावले सर्वांना
तिच्या गोड आवाजाने
कंठी होते सप्तसूर
जिभेवर सरस्वती
गाणे एैकता एैकता
झाले सर्व सुखपती
हिंदी मराठी गायकी
तीची एैकून अनेक
पिढ्या समृद्ध जगल्या
काही बनले गायक
सुर छेडले दीदीने
जणु कृष्णाची मुरली
चैन पडेना कृष्णाला
त्याने परत घेतली
त्याला सुध्दा त्या सुरांची
जणु भुरळ पडली
त्यानी आपली सर्वांची
स्वरलता बोलावली
सर्व आयुष्य बेसूर
आणि स्वरहीन झाले
जगातील सर्व लोक
खूप दु:खी कष्टी झाले
देवा काय साधलेस
तुझी बासरी घेऊनी
आम्हा तमाम लोकांना
स्वर कंगाल करूनी
दीदी सारखी गायिका
पुन्हा आता होणे नाही
तिच्या स्वरात भिजणे
याच्या सम सुख नाही
स्पाउस उमेश गोखले
रोटरी क्लब ऑफ पिंपरी