Editor
Rtn. Shubhangi Mulay
February-2025
District Governor
Rtn. Shital Shah

पहिलं रोटरी मराठी साहित्य संमेलन Back

कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात ४ व५ जानेवारी २०२५ रोजी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने आयोजित केलेल्या पहिल्या रोटरी मराठी साहित्य संमेलनावरसर्वसामान्यांकडूनही कौतुकाचा मोठावर्षाव झाला.

डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रो.शीतलशाह, संमेलनाध्यक्षविश्वासपाटील, कार्याध्यक्षरो.राजीवबर्वे, स्वागताध्यक्षविनोदजाधव, प्रमुखपाहुणेचंदूबोर्डे, महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्रीचंद्रकांतपाटील, अनेक पास्ट डिस्ट्रिक्ट गव्हर्नर, व सर्व यजमानक्लबचे अध्यक्ष यांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा दिमाखात पार पडला. उदघाटनापूर्वी कर्वे पुतळ्यापासून ग्रंथदिंडीचे आयोजनही करण्यात आले होते.

संमेलनाध्यक्ष पानीपतकारविश्वास पाटीलयांचीरो.वैशाली वर्णेकर व रो.अभय जबडेयांनी घेतलेलीमुलाखत छान रंगली. प्रत्येक कादंबरी लिहिण्यापूर्वी सर्व ऐतिहासिकतथ्येजाणून घेण्यासाठी विश्वास पाटीलांनी घेतलेली मेहनतसमजून घेणे अत्यंतप्रेरणादायी होते.

यशस्वी लेखनाची सुत्रेया परिसंवादात शिवराज गोर्ले, श्रीनिवास भणगेवडॉ.वंदना बोकीलकुलकणीयांनी लेखन यशस्वी होण्यासाठी कशी तयारी केली पाहिजे यासंबंधीउपस्थितांना मार्गदर्शन केले.

कवयित्री अंजली कुलकर्णी यांनी सुत्रसंचालन केलेल्या कवी संमेलनात अनेक रोटेरियन्सना त्यांची कला सादर करण्याची संधी मिळाली. सुप्रसिद्धकवी रामदास फुटाणे यांच्या केवळ कविताच नव्हेतर रोटेरियन्सच्या कवितांविषयीत्यांचे विचार ऐकण्याचीपर्वणी लाभली.

पहिल्या दिवसाचा शेवट भरत नाट्यसंशोधन मंदिरानेसादर केलेल्याकट्यार काळजात घुसलीयासंगीत नाटकाने झाला. डॉ. चारुदत्त आफळे व ऋषीकेश बडवे यांचे गायन आणि अभय जबडेयांचा समर्थअभिनययाचा आनंद घेऊन प्रेक्षक अगदीतृप्त झाले.

दुसऱ्या दिवसाची सुरुवातज्येष्ठ व्यंगचित्रकारशि. द. फडणीस यांनारोटरीचेव्होकेशनल एक्सलन्स अवॉर्डदेवून गौरवण्यानेझाली. त्यापाठोपाठ हास्यकवी अशोक नायगावकर यांची मुलाखत प्राध्यापक मिलिंद जोशी यांनी घेतली तेव्हा 2 तास संपूर्ण सभागृह हास्यकल्लोळातबुडून गेले होते!

“ए.आय.चा साहित्यावर परिणाम होईल का?” या परिसंवादाचे नेतृत्वरो. डॉ. दीपक शिकारपूरयांनी केले.प्रदीप निफाडकर, कुलदीप देशपांडे, महेश बोंद्रे, डॉक्टर आदित्य अभ्यंकर यांनी आपले विचार यावेळी व्यक्त केले.

यानंतरअमृतसंचयहाग. दि. माडगूळकर यांच्या साहित्यावर आधारित सांगीतिक कार्यक्रमरोटेरियन गायकांनी सादर केला. रो. मनीषा अधिकारी व स्नेहल दामलेयांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. भाऊ तोरसेकर यांच्याशी अभिजीत जोग यांच्या गप्पा ऐकण्यासाठी सभागृह ओसंडूनवाहत होते. 

रो. अविनाश ओगले व त्यांच्या रोटेरियन सहकार्यांनी सादर केलेल्या प्रहसनांनी कार्यक्रमाची रंगत अजूनच वाढवली. दोन दिवससर्वच कार्यक्रमांचा प्रेक्षकांनी मनमुराद आनंद लुटला.

खासदार मुरलीधर मोहोळ यांनी आपल्या समारोपाच्या भाषणात रोटरीच्या कार्याचे दिलखुलास कौतुक केले.

अशा पद्धतीचे दोन दिवसांचे साहित्य संमेलन आयोजित करावे ही कल्पना मुळात डिस्ट्रिक्ट गव्हर्नर शीतल शाह यांची. पुणे हेरिटेज क्लबचे प्रेसिडेंट सूर्यकांत वझेआणि कार्यक्रमांचे मुख्य संयोजक राजीव बर्वे यांच्याशी त्यांनी मे महिन्यातच याविषयी चर्चा केली होती यादोघांनीही या कल्पनेला लगेचच उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि झपाटय़ाने कामही चालू केले.हेरिटेज क्लब मधील मधुमिता बर्वे, मोहन चौबळ, संगीताकाकडे, सोनाली चौबळ, मोहन काकडे यांसह इतरही अनेक क्लब मेंबर्सनी संमेलनाच्या संयोजनासाठी झोकून देऊन काम केले. डिस्ट्रिक्टमधील १५ इतर क्लब्सनी सहआयोजक म्हणूनसक्रिय सहभाग घेतला. वोकेशनल, कल्चरल, पी आय या डिस्ट्रिक्ट कमिटीच्या सदस्यांनीही सुरेख साथ दिली.

सावा हर्बल्सच्यामाध्यमातूनविनोद जाधवयानी दिलेलेआर्थिक पाठबळ संमेलनाच्या यशासाठी खूपच महत्त्वाचे होते. त्याचबरोबर सहप्रायोजक पू. ना. गाडगीळ एक्सक्लूसिव, तसेच केवळ रोटरीच्या वमराठी संस्कृतीच्या प्रेमाखातर आर्थिक पाठिंबा देणारे रोटेरियन सुरेश नातू, माजी प्रांतपाल प्रशांत देशमुख, रोटेरियन अभय जबडे यांच्यादातृत्वामुळेच हे संमेलन यशस्वी होऊ शकले.

साहित्य संमेलनाच्या यशस्वी आयोजनामुळे रोटरीडिस्ट्रिक्ट ३१३१ च्या शिरपेचात एक मानाचा तुराच खोवला गेला आहे. असा हा दिमाखदार, प्रेक्षणीय वआनंदमय सोहळा केवळ एका वर्षासाठी मर्यादित न राहता साहित्य संमेलनाचे आयोजन दरवर्षी केले जावे अशी अपेक्षा सर्वच उपस्थितांनीव्यक्त केली. रोटरी क्लब ऑफ पुणेहेरिटेज यासाठी पुढाकार घेण्यास नक्कीच सज्ज आहे. तेव्हा लवकरच पुन्हा भेटूया दुसऱ्या रोटरी मराठी साहित्य संमेलनासाठी२०२६ मध्ये!

या पहिल्या रोटरी मराठी साहित्य संमेलनाचा यजमान क्लब होता रोटरी क्लब ऑफ पुणे हेरिटेज.

 

सहयजमान क्लबस होते :

रोटरी क्लब ऑफ पुणे मेट्रो, पुणे सिंहगड रोड, निगडी पुणे, पुणे ईस्ट, पुणे विजडम,

रोटरी क्लब ऑफ पुणे साऊथ, पुणे पर्वती, पुणे प्राईड, पिंपरी ईलीट, लोकमान्य नगर,

रोटरी क्लब ऑफ पुणे यूनिवर्सिटी, पुणे शिवाजीनगर, पुणे एन आय बी एम, पुणे शनिवारवाडा

रो. मोहन चौबळ

रोटरी क्लब ऑफ पुणे हेरिटेज