शांतता पुरस्कार सोहळा
समाजातील शांतता आणि सलोखा राखण्याचे अनेक पैलू आहेत. गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवणारे पोलीस, सीमेवर पहारा देणारा सैनिक जसा ह्या शांतता आणि सलोखा राखण्याच्या कामातील महत्वाचा घटक आहे तसाच एक समाजातील तळागाळातील माणसापर्यंत पोचून त्याचं जीवन सुधारण्याचं काम करणाऱ्या , समुदायाचं सक्षमीकरण आणि सामाजिक न्याय साध्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्याचा पण ह्यात मोलाचा वाटा आहे. असेच पिटेझरी सारख्या गावात राहून तेथील आदिवासी स्त्रियांना रोजगार साधने उपलब्ध करून देणाऱ्या व मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी झटणाऱ्या सुप्रसिद्ध पक्षीतज्ञ श्री. किरण पुरंदरे ह्यांना २०२४ - २५ साठीचा शांतता पुरस्कार रोटरी क्लब ऑफ पुणे शिवाजीनगर तर्फे दि ६ फेब्रुवारी रोजी प्रदान करण्यात आला.