अटीतटीच्या लढतीत निवडून आली
सगळ्यांच्या गळ्यातील ताईत झाली
कॉर्पोरेट ते फिटनेस सगळ्यातअव्वल
35 देश पालथे घातले तब्बल
अफाट स्मरणशक्ती अचाट वक्तृत्व
उत्कृष्ट नियोजन असे तिचे कर्तुत्व
नाही माहित तिला थकवा नि कंटाळा
सतत आहे भिंगरी तिच्या पायाला
माणसे सांभाळण्याची तिला हातोटी
व्यवहारात तिच्या आहे सचोटी
बुद्धीचातुर्या सवे आहे ती योजनाबद्ध
कार्य करण्या असे सदा कटीबद्ध
3131 ला नेले उन्नत शिखरी
नावीन्यपूर्ण उपक्रम, प्रकल्प व्यवहारी
महिलाच्या उपक्रमात आहे तीअग्रेसर
सॅलव्हिया लिडरशिप अवॉर्ड खरोखर
हे सगळे करताना कुटुंब ही सांभाळले
विश्वास ला साथ देत ईशाला घडविले
सौंदर्य आणि बुद्धिमत्तेची सुंदर गुंफण
ईश्वराने तिला घडविले मनोमन
- रो ममता कोल्हटकर
8 मार्च 2024