स्वरांजली देशभक्तीची
दिनांक २६ जानेवारी २०२५ रोजी रोटरी क्लब ऑफ पेण तर्फे 'स्वरांजली देशभक्तीची' या देशभक्तीपर गाण्यांचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमामध्ये पेण येथील नेनेज् करओके स्टुडिओ यामधील गायक कलाकारांनी सहभाग घेतला होता. देशभक्तीपर गाण्यांची अतिशय सुरेल अशी संध्याकाळ पेणकरांना अनुभवास मिळाली. याच कार्यक्रमांतर्गत रोटरी क्लब ऑफ पेणने व्होकेशनल मंथचे औचित्य साधून पेण मधील मा. श्री. अरविंद वनगे यांना 'सेवा उत्कृष्टता पुरस्कार' देऊन सन्मानित केले. श्री. अरविंद वनगे हे पेण येथील महात्मा गांधी वाचनालयाचे अध्यक्ष असून या ग्रंथालयामार्फत त्यांनी पेणकरांमध्ये वाचन संस्कृतीचे आवड गेल्या ४० वर्षांपासून जपायला मदत केली आहे.
'व्यावसायिक गुणवत्ता पुरस्कार' हा रोटरी क्लब ऑफ पेण तर्फे मा. श्री. राजू पिचिका यांना प्रदान करण्यात आला. श्री पीचीका हे व्यवसायाने बिल्डर असून शैक्षणिक, वैद्यकीय आणि आपत्ती व्यवस्थापनामध्ये ते अतिशय उत्कृष्ट समाजकार्य करत आहेत. पेणमध्ये त्यांची 'जीवनदूत आणि आपत्ती व्यवस्थापनाचे सहकारी' अशी ओळख आहे.
तिसरा 'शांतता पुरस्कार' रोटरी क्लब ऑफ पेण तर्फे पेण मध्ये नव्यानेच रुजू झालेले पोलीस निरीक्षक मा.श्री. संदीप बागुल यांना प्रदान करण्यात आला. शांत, संयमी परंतु कडक, शिस्तप्रिय अशा या व्यक्तिमत्वास रोटरी क्लब ऑफ पेण तर्फे त्यांच्या काही महिन्यांच्या कालावधीतच केलेल्या कार्याची नोंद घेऊन 'शांतता पुरस्कार' प्रदान करण्यात आला.
मनात देशभक्तीची सुरेल संध्याकाळ आणि या सर्व व्यक्तिमत्त्वांचे प्रेरणाक्षण पेणकरांनी या कार्यक्रमामध्ये अनुभवले.
या कार्यक्रमास पेणच्या माजी नगराध्यक्ष मा. प्रीतमताई पाटील, नेनेज् कराओके स्टुडिओचे अध्यक्ष आणि पेण प्रायव्हेट स्कूलचे अध्यक्ष ॲड.श्री. मंगेश नेने, महिला बालकल्याण मंडळाच्या जुवेनाईल मॅजिस्ट्रेट अँड.डॉ. नीता कदम आणि पेण मधील अनेक मान्यवर उपस्थित होते. त्याचप्रमाणे रोटरी क्लब ऑफ पुणे अनेक सदस्य देखील उपस्थित होते.
अध्यक्ष रो.संयोगिता टेंमघरे
रोटरी क्लब ऑफ पेण