रोटरी क्लब ऑफ पुणे सहवासची आश्रमशाळेला भेट आणि धान्याचे वाटप
Back
रोटरी क्लब ऑफ पुणे सहवास च्या माध्यमातून पानशेत येथील श्री साई एज्युकेशन ट्रस्ट च्या वतीने चालविण्यात येणाऱ्या आश्रमशाळेला भेट देण्यात आली. AG रो. किरण इंगळे यांच्या आई सुलोचना इंगळे यांच्या 75 री निमित्त आश्रमशाळेला 75 किलो धान्याचे वाटप रो. किरण यांनी केले. अत्यंत गरजू अशी आजूबाजूच्या वाड्यावस्तीतील एकूण 18 मुलं इथे शिकायला आहेत. ज्यांच्या गावात इयत्ता 4 थी च्या पुढे शिक्षणाची सोय उपलब्ध नाही अशा मुलांचा सांभाळ इथे इयत्ता 10 पर्यंत केला जातो. सगळी मुलं ही एकल पालकांची किंवा जे पालक मुलांना शिकवू शकत नाही अशी आहेत. अतिशय मायेने त्यांचा सांभाळ केला जातो आणि त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मदत केली जाते. 2013 पासून आजूबाजूच्या गावातील तरुणांनी एकत्र येऊन हा अतिशय स्तुत्य उपक्रम चालू केला आहे आणि त्यामुळे मुलांचं शिक्षण पूर्ण होण्यासाठी मदत होत आहे. सर्व उपस्थितांनी किरण यांच्या आईंना उदंड.. निरोगी... आनंदी आयुष्य लाभो ही प्रार्थना करून आभार व्यक्त केले.
रोटरी क्लब ऑफ पुणे सहवास च्या वतीने देखील किरण यांच्या आईंना दीर्घायुष्य लाभो हि सदिच्छा आणि मनःपूर्वक धन्यवाद.