२१ ऑक्टोबर सोमवारी रात्री ९ वाजता रोटरीचे इंद्रधनूचा भाग दुसरा मोठ्या दिमाखात यशवंतराव चव्हाण नाट्यगृह इथे पार पडला.
याही वेळी मोठ्या उत्साहाने रोटरीमधील कलाकारांनी यात भाग घेतला.एकूण ३० कार्यक्रम यात घेण्यात आले होते.
डिस्ट्रिक्ट मधील बहुसंख्य डायरेक्टर्स कार्यक्रमाला उपस्थित होते.डी.जी.रो.शीतल शहा यांच्या गाण्याने कार्यक्रमाचा शेवट करण्यात आला.
कार्यक्रमानंतर १६ सप्टेंबर आणि २१ ऑक्टोबर रोजी भाग घेतलेल्या सगळ्या कलाकारांना सर्टिफिकेट्स देण्यात आली.
डी.जी. रो. शितल शहा यांनी कबूल केल्याप्रमाणे दुसराही कार्यक्रम तितक्याच दणक्यात साजरा झाला.
सुरेल दिवाळी पहाट
डिस्ट्रिक्ट ३१३१ ची सांस्कृतिक कमिटी सातत्याने नवीन नवीन कार्यक्रम करत आहेत आणि त्याला भरघोस प्रतिसाद मिळत आहे.
२८ऑक्टोबर रोजी दिवाळी पहाट डिस्ट्रिक्टने आयोजित केली होती.प्रसिद्ध गायक प्रथमेश लघाटे, सौ मुग्धा वैशंपायन यांचा बहारदार कार्यक्रम झाला.पूर्ण कार्यक्रमाचे निवेदन रो. वैशाली वरणेकर ( कल्चरल डायरेक्टर ३१३१ ) हिने केले.
होस्ट क्लब होते नांदेड सिटी क्लब आणि को होस्ट होते सारसबाग क्लब.
सुरवातीला डी.जी.रो. शितल शहा यांच्या हस्ते दीपप्रज्वलन होऊन कार्यक्रमाला सुरवात झाली आणि नंतर २ तास कार्यक्रम रंगत गेला.
प्रथमेश आणि मुग्धा यांच्या सुरेल सुंदर गाण्यांनी दिवाळीची सुरवात फार छान झाली
साधारण २५०० श्रुते कार्यक्रमाला हजर होते.
रो. वैशाली वर्णेकर
डिस्ट्रिक्ट डायरेक्टर, कल्चरल