नको पाहूस वाट ,
कुणाच्या परवानगीची
पंखही तुझेच,
आणि आभाळ ही...
नको पाहूस वाट ,
कुणाच्या समर्थनाची...
मार्गही तुझेच,
आणि ध्येय ही....
नको पाहूस वाट ,
कुणाच्या साथीची..
विचार ही तुझेच
आणि पाऊलही ...
नको पाहूस वाट,
कुणी दिशा दाखवण्याची,
प्रयत्न ही तुझेच .
आणि संकल्प ही ..
नको पाहूस वाट ,
कुणी धैर्य दाखवण्याची ..
सामर्थ्य ही तुझेच,
आणि प्रेरणा ही..
नको पाहूस वाट ,
अनुकूल काळाची..
क्षण ही तुझेच
आणि वेळ ही ...
नको पाहूस वाट ,
वाजणार्या टाळ्यांची..
स्वप्नं ही तुझेच
आणि यश ही ...
नको पाहूस वाट,
कसल्या गौरवाची...
समाधान ही तुझेच
आणि आनंद ही....
रो. अर्चना गोजमगुंडे
रोटरी क्लब ऑफ पुणे मगरपट्टा इलाईट