ट्रेक : किल्ले - चावंड (प्रसन्नगड)
रोटरी डिस्ट्रिक्ट 3131स्पोर्ट्स कमिटी आयोजित किल्ले चावंड ( प्रसन्नगड ) हा ट्रेक रविवार दिनांक 18-08-2024 रोजी रोटरी क्लब ऑफ आळेफाटा सेंट्रल यांनी नियोजित केला होता व रोटरी क्लब ऑफ जुन्नरचे अध्यक्ष रो.सुनील जाधव यांनी स्वागत व नाश्त्याची सोय केली होती. ह्या ट्रेक साठी रो. प्रमोद पालीवाल, रो.प्रसाद माने व 20 ट्रेकर्सनी सहभाग नोंदवला. त्यामध्ये बेल्शियमहून आलेला RYE स्टुडन्ट Emile Falesse सुद्धा होता.
नंतर सर्वांनी चमचमीत जेवणाचा आस्वाद घेतला.
त्यानंतर दुपारी सर्वांनी नाणेघाट आणि रिव्हर्स वॉटर फॉल सुद्धा पाहिला. सर्वांनी दाट धुक्याचा व नैसर्गिक सौंदर्याचा अनुभव लुटला.
तेथील लोकल गाईड श्री. गायकवाड यांनी उत्तम पद्धतीने नाणेघाट व किल्ल्याची माहिती सर्वांना दिली. त्यानंतर संध्याकाळी 6 वाजता जुन्नर वरून परतिच्या प्रवासासाठी सर्वजण निघाले. परतीचा प्रवास देखील छान झाला आणि ट्रेकच्या सुंदर आठवणींचा साठा सर्वांनी आपल्या हृदयात जपून ठेवला. 🙏