रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ (23 Clubs) व कृषी विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने वनराई बंधारे मोहीम १३ तालुक्यात सुरु झाली. शुक्रवार दिनांक १३ ऑक्टोबर 2023 (ग्रीन फ्रायडे) पर्यंत एकूण ४०६ वनराई बंधारे बांधण्यात आले. एकूण १ सहस्त्र घनमीटर पाणी अडवले गेले. हे पाणी जमीनीत बंधाऱ्यांच्या साहाय्याने मुरवून शेतीसाठी वापरता येणार आहे. आजच्या दुष्काळ सदृश परिस्थितीत रोटरी क्लब ने एक सामाजिक जबाबदारी म्हणून सोबत येवून ह्या “पाणी अडवा,पाणी जिरवा” चळवळीला मूर्त रुप दिले आहे. अनेक तालुक्यात ही वनराई बंधारे बांधण्याची मोहीम नोव्हेंबर पर्यंत चालू राहणार आहे. अजूनही काही क्लब आपआपल्या तालुक्यात ह्या उपक्रमात सहभाग नोंदवू शकतात.
आतापर्यंत खालील क्लबने योगदान दिले आहे: रोटरी क्लब ऑफ पुणे कॅम्प, रोटरी क्लब ऑफ मंचर, रोटरी क्लब ऑफ आळेफाटा हायवे, रोटरी क्लब ऑफ जुन्नर, रोटरी क्लब ऑफ नारायणगाव, रोटरी क्लब ऑफ नारायणगाव हायवे, रोटरी क्लब ऑफ आळेफाटा सेंट्रल, रोटरी क्लब ऑफ चाकण, रोटरी क्लब ऑफ चाकण एअरपोर्ट, रोटरी क्लब ऑफ बारामती, रोटरी क्लब ऑफ दौंड, रोटरी क्लब ऑफ नगर रोड, रोटरी क्लब ऑफ शिक्रापुर, रोटरी क्लब ऑफ इंदापूर, रोटरी क्लब ऑफ पुरंदर, रोटरी कम्यिनिटी कॉर्प्स, पुणे कॅम्प, सासवड, रोटरी कम्युनिटी कॉर्प्स, पुणे कॅम्प, करंदी, रोटरी क्लब भोर, रोटरी क्लब तळेगाव, रोटरी क्लब मावळ, रोटरी क्लब चिंचवड, रोटरी क्लब ऑफ पिंपरी इलाईट, रोटरी क्लब ऑफ प्राधिकरण.
हा उपक्रम यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी रोटरी क्लब ऑफ कॅम्प चे अध्यक्ष रो. प्रदीप खेडेकर व जिल्हा कृषी अधिकारी श्री. संजय काचोळे ह्यांचे फार मोठे योगदान आहे.