रोटरी एन्व्हायरमेंट अवेन्यू
Back
आपले एन्व्हायरमेंट म्हणजे आपल्या सभोवतालचे वातावरण. हे वातावरण पंचमहाभूतांपासून तयार झालेले आहे. ती पंचमहाभूते म्हणजे आकाश, वायू, पृथ्वी, जल आणि अग्नी. यामध्ये नेमके या पंचमहाभूतांचा संरक्षण करणं हे आपलं महत्त्वाचं काम आहे. यावर्षीची एन्व्हायरमेंट कमिटी मोठी आहे आणि यावर्षी देखील खूप काम करण्याचा मानसही आहे. यामध्ये एकूण दहा व्हर्टिकल्स आहेत आणि या दहा वर्टीकल्स मध्ये आपण काम करणार आहोत. व्हर्टिकल नंबर १ ससटटेनेबल ट्री प्लांटेशन,व्हर्टिकल नंबर २ प्लास्टिक वेस्ट आणि इ वेस्ट, व्हर्टिकल नंबर ३ ग्रीन सोसायटी आणि ग्रीन फॅक्टरी, वर्टीकल नंबर ४ एअर एनवोर्मेन्ट,वर्टीकल नंबर ५ लाईफस्टाईल फॉर एन्व्हायरमेंट अँड कार्बन फूट प्रिंट,वर्टीकल नंबर ६ सोलर एनर्जी, वर्टीकल नंबर ७ बायो डायव्हर्सिटी कन्वर्सेशन अँड प्रोटेक्शन,वर्टीकल नंबर ८ आहे एन्व्हायरमेंट स्टेवर्डशिप, वर्टीकल नंबर ९ ग्रीन पीरियड्स, व्हर्टिकल नंबर १० प्रोटेक्शन अँड प्रीजर्वेशन ऑफ वॉटर रिसोर्सेस.असे एकूण दहा वर्टीकल्स आणि त्या दहा व्हर्टिकलचे दहा लीडर्स आहेत .प्रत्येक झोनमध्ये झोन वाईज झोनल डायरेक्टरसची नेमणूक करण्यात आली आहे.
या वर्षामध्ये दोन लाख झाडे लावण्याचे टार्गेट ठरवलेले आहे. त्याचप्रमाणे १००० एन्व्हायरमेंट स्टैर्ड्स तयार करण्याचे ठरवले आहे.७० ग्रीन सोसायटीस करण्याचे ठरवले आहे.१०,००० रियुजेबल पॅड डिस्ट्रीब्यूशनचे ठरवले आहे. प्लास्टिक कलेक्शन आणि ई-वेस्ट कलेक्शन हे प्रत्येक आठवड्याच्या शनिवारी आणि रविवारी चालूच आहे. आणि ते वर्षभर चालूच राहणार आहे. बायोडायव्हर्सिटी मध्ये प्रत्येक झोनमध्ये झाडांचे एक प्रदर्शन घेण्यात येणार आहे. सोलर मध्ये एक करोड रुपये सीएसआर ग्रँट प्राप्त होण्याच्या मार्गावर आहे. यामध्ये शाळांमध्ये आणि सार्वजनिक ठिकाणी सोलरची व्यवस्था करण्याचे ठरवले आहे. राम नदीसारख्या नद्या व शहरातून वाहणारे जे काही छोटे ओढे आहेत त्यांच्या पाण्याचे शुद्धीकरण करण्याचे ठरवले आहे. एअर एनवोर्मेन्ट कार्बन फुटप्रिंट यासारख्या व्हर्टिकल्स मध्ये अवेअरनेसचे प्रोग्राम राबविण्यात येणार आहेत. अशा पद्धतीने वर्षभराचे कामकाज होणार आहे. हे सर्व कामकाज एनवोर्मेन्ट कमिटीचे डायरेक्टर रो.वसंतराव माळुंजकर तसेच मेंटर रो.राजेंद्र कुमार सराफ, कमिटीचे सेक्रेटरी डॉ. अजय दरेकर,को - डायरेक्टर रेश्मा कुरूप, को डायरेक्टर समरी शास्त्री, को डायरेक्टर गणेशजी बोरा असे सर्वजण काम करत आहेत. एनवोर्मेन्ट कमिटीने वर्षभर काम करण्याचा आराखडा तयार केलेला आहे. आपले डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रो. शीतलजी शहा यांचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळतच असते आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व कामकाज चालू आहे.
रो. वसंतराव माळुंजकर
डायरेक्टर एनवोर्मेन्ट
डिस्ट्रिक्ट ३१३१