Rotary Club of Poona Midtown
Back
रोटरी रथ -
सामाजिक बांधिलकी आणि रोटरीच्या सामाजिक प्रकल्पांची माहिती देऊन रोटरीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी रोटरी क्लब ऑफ पूना मिडटाऊनने पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूकीमध्ये 'रोटरी रथ' हा Rotary Public Image प्रकल्प सादर केला.
मंगळवार दि.१७ सप्टेंबर २०२४ रोजी गणपती विसर्जन मिरवणुकीमध्ये आपला रोटरी क्लब ऑफ पूना मिडटाऊनने 'ग्राहक पेठ' टिळक रोड, पुणे, यांच्यासोबत सायं. ४.३० वाजता एस.पी.कॉलेज चौक येथून आपल्या "रोटरी रथ" समवेत विसर्जन मिरवणुकीत सामील झाला. या रोटरी रथासोबत सर्व रोटेरिअन्स, स्पाऊसेस आणि रोट्रॅक्टर्स सहभागी झाले.
या "रोटरी रथा"च्या पुढील दर्शनीय भागावर 'Club Name, यावर्षीची रोटरी थीम, Logo, Join Rotary' असे बॅनर बोर्ड होते, तर मागील बाजूच्या बॅनर बोर्डवर 'Rotary Wheel, Club Name, Service above Self, I am Proud Rotary Member' असं लिहिलेला छानसा 'सेल्फी पॉईंट होता, तर गाडीच्या दोन्हीही साईड बाजूस बॅनर बोर्डवर 'आपल्या क्लबचे नाव व प्रोजेक्ट्सची माहिती व फोटो,' जसे Happy School, Blood Donation, Good Touch Bad Touch, Rotary's Focus Areas असे मोठया आकारात छापले होते'. त्याचप्रमाणे "रोटरीचा आवाज सामाजिक बांधिलकीची साद, जागतिक पोलिओ निर्मूलन रोटरीचा संकल्प, समाजाचा विकास रोटरीचा ध्यास, पाण्याची बचत भविष्यातील संपत्ती, शिक्षणाचा दिप लावा अज्ञानाचा अंधार दूर करा" असे लिहिलेले बॅनर रोटेरिअन्स व अँन्स ने हातात धरून सर्व जनमानसात हे सामाजिक संदेश पोहचवले. यावेळी उपस्थित क्लबचे रोटेरिअन्स व स्पाऊसेसने सलवार-कमिज, झब्बा-कुर्ता, टोपी, गळ्यात 'गणपती बाप्पा मोरया'ची सुंदर शेला पट्टी परिधान केली होती.
अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने 'रोटरी क्लब ऑफ पूना मिडटाऊन'ने "रोटरीचे कार्य, रोटरीचे संकल्प व रोटरीची सामाजिक बांधिलकी" याविषयीची माहिती गणेश विसर्जन मिरवणूकीचे निमित्त साधून असंख्य सामान्य लोकांपर्यंत पोहचवली. याप्रसंगी अनेकवेळा गणपती विसर्जन मिरवणूक पाहायला जमलेल्या लोकांनी व खास करून तरुण-तरुणींनी आपल्या रोटरी रथाजवळ येऊन रोटरी व रोटरीचे कार्य याविषयी माहिती जाणून घेतली. तसेच रोटरीरथा सोबत, रोटेरिअन्स सोबत व सेल्फी पॉईंटला आवर्जून फोटोज व व्हिडीओ काढले. ज्यामुळे रोटरीची इमेज सर्वसामान्य लोकांमध्ये नक्कीच उंचावली. पुण्यातीलच नव्हे तर इतर शहरातील रोटेरिअन्सही आवर्जून थांबून चौकशी व कौतुक करून गेले. हा खुपच चांगला अनुभव होता, जो रोटरी मुळे शक्य झाला.
या प्रसंगी अध्यक्ष रो.अभिजीत म्हसकर व क्लबचे अन्य रोटेरियन्स, स्पाऊसेस, रोट्रॅक्टर्स आवर्जून उपस्थित होते.
रो. अभिजीत म्हसकर
अध्यक्ष, रोटरी क्लब ऑफ पुना मिडटाऊन