District Governor - Rtn. Manjoo Phadke
Jul_2-2024
Editor - Rtn. Madhur Dolare

Club Anniversary Poem by Rtn. Varsha Hirwe Back

क्लबने केलेल्या अठ्ठावीस वर्षाच्या वाटचालीसाठी एक छोटेसे मनोगत

कात्रज क्लबचे इवलेसे रोप जोशी सरांनी प्रथम लावले

रामचंद्र, हर्षवर्धन, सुनिल, हणमंत, संतांच्या कारकिर्दीत छान बहरले

राम, धनंजय यांनी जोपासून रोपास केले डेरेदार

संपूर्ण रोटरी प्रांतात झाले कात्रज क्लबचे नाव तडफदार

विभाकर, प्रभाकर यांनी करून रोपाची निगराणी

अभय, प्रसाद, गजानन, संजय यांनी घातले पूरक खतपाणी

अतुल, अनंत, अजित, नितीनने क्लबची पेलली यशस्वी धुरा

पुष्कराजच्या कल्पनांनी शिरपेचात खोचला मानाचा तुरा

कधीच नव्हता इथेही मागे महिला अध्यक्षांचा नारा

सुवर्णा, किर्ती, विद्या, नमिता यांनी तोलला वृक्षाचा डोलारा

मिलिंदच्या काळात झाले क्लबचे नाव सर्वदूर

अस्मिताच्या विविधरूपात साथ यथेच्छ आणि भरपूर

अध्यक्षांच्या यशात साथीला होत्या कर्तृत्ववान भार्या

वर्षभर पाठीशी राहिल्या क्लबच्या हरदम कार्या

रोटरी परिवारात आहेच आपली चौफेर ख्याती

सतत वृद्धिंगत व्हावी कात्रज क्लबची यशवंत किर्ती

-Rtn Varsha Hirwe

RCP Katraj