स्वाती क्षिरसागर करंडक आंतर रोटरी एकांकिका स्पर्धा
शिवाजीनगर क्लब गेली २५ वर्षे अव्याहतपणें आंतररोटरी एकांकिका करंडक स्पर्धा आयोजित करीत आहे. या वर्षी सुद्धा ही स्पर्धा दिनांक १४ ते २० ऑक्टोबर या कालावधीत, भरत नाट्य मंदिर येथे घेण्यात आली. एकूण १५ संघांनी यात सहभाग घेतला. अत्यंत दर्जेदार एकांकिकाचें सादरीकरण करण्यात आले. गेली तीन वर्षे कायम प्रथम किंवा द्वितीय क्रमांक पटकावणाऱ्या व वैयक्तिक बक्षिसे मिळविणाऱ्या, फिनिक्स क्लबने आपली यशस्वी परंपरा कायम राखत याही वर्षी प्रथम क्रमांक पटकावला. या शिवाय अँनेट रमणी देशपांडे - उत्कृष्ठ अँनेट, रोटे. केतकी कुलकर्णी - अभिनय प्रथम (महिला), रोटे. शंतनु खुर्जेकर - लेखन द्वितीय, रोटे. माधव सोमण - दिग्दर्शन प्रथम, रोटे. स्वाती कुमठेकर - नेपथ्य प्रथम अशी वैयक्तिक पारितोषिके मिळाली. अभिनेत्री संपदा जोगळेकर कुळकर्णी यांच्या कथेवर आधारित या एकांकिकेने प्रेक्षकांच्या हृदयाचा ठाव घेतला, तर अँनेट रमणी देशपांडे हिच्या सहज सुंदर अभिनयाने एकांकिकेने वेगळी उंची गाठली. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ प्रख्यात अभिनेते मोहन जोशी यांच्या हस्ते झाला. तर ज्येष्ठ लेखिका मंगला गोडबोले तसेच डिस्ट्रिक्ट ३१३१ चे नियोजित प्रांतपाल संतोष मराठे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी श्रीमती मंगला गोडबोले यांच्या हस्ते रौप्य महोत्सवी स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.
रो. माधव सोमण
रोटरी क्लब ऑफ पुणे फिनिक्स