Editor
Rtn. Shubhangi Mulay
October-2024
District Governor
Rtn. Shital Shah

Rotary Club of Hadapsar Central Back
थॅलेसेमिया जनजागृती कार्यक्रम -
दिनांक १३ सप्टेंबर २०२४ रोजी रोटरी क्लब ऑफ हडपसर सेंट्रल आणि रायझिंग मेडिकेअर हॉस्पिटल खराडी यांच्या संयुक्त विद्यमाने ख्राइस्ट कॉलेज वडगाव शेरी येथे थॅलेसेमिया जनजागृती कार्यक्रम पार पडला.
थॅलेसेमिया सोसायटी पुणे चॅप्टरच्या अध्यक्षा डॉ. निता मुनशी यांनी थॅलेसेमिया आजाराविषयीची माहिती समजेल अशा सहज सोप्या भाषेत सांगितली.यावेळी एका थॅलेसेमिया ग्रस्त रुग्णाने स्वतः विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती केली.या कार्यक्रमाचे यश म्हणजे यावेळी कॉलेज मधील १३९ युवक/ युवतींनी आपल्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी दिले.
या कार्यक्रमामध्ये अध्यक्ष रो.सोमिनाथ तनपुरे यांनी रोटरी क्लबचे विद्यार्थांसाठीच प्रकल्प, रोटारॅक्ट विषयी विद्यार्थी अवगत व्हावेत यासाठीची माहिती दिली.
यावेळी रोटरी क्लब ऑफ हडपसर सेंट्रलचे अनेक सदस्य,तसेच असिटंट गव्हर्नर रो.डॉ. मिलिंद भौसुरे, डिस्ट्रिक्ट को - डायरेक्टर रो. झिम्रा इस्राईल, फादर अरुण, डॉ. पूजा वहाब, कौन्सेलर सौ. रुबी कुमारी असे अनेक मान्यवर उपस्थित होते. त्याचप्रमाणे २५० विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला.

आरोग्य विषयक मार्गदर्शन व मोफत आरोग्य तपासणी शिबिर-
दिनांक २३ सप्टेंबर २०२४ रोजी रोटरी क्लब ऑफ हडपसर सेंट्रल आयोजित वाघोली मुस्लिम वेल्फेअर असोसिएशन आणि रायझिंग मेडीकेअर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने वि.शे.सातव हायस्कूल येथील विद्यार्थिनी व शिक्षकांसाठी आरोग्य विषयक मार्गदर्शन व मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले होते.
यावेळी डॉ. निता मुनशी यांचे थलासेमिया जनजागृती मार्गदर्शनपर व्याख्यान झाले, डॉ सरफराज पठाण यांनी कर्करोग होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी याचे मार्गदर्शन केले तर डॉ. पूनम गेडाम यांनी महिला आणि मुलींना आरोग्यविषयक काळजी कशी घ्यावी याबद्दल मार्गदर्शन केले.
या तपासणी शिबिरामध्ये एकूण २०० मुलींची व शिक्षकांची आरोग्य तपासणी करण्यात आली, थॅलेसेमिया साठी ७१ मुलींचे नमुने घेण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून पुणे जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे आजीव सदस्य प्रदीप कदम,वाघोली मुस्लिम वेल्फेअर असोसिएशनचे चेअरमन जानमहम्मद पठाण, सदस्य इब्राहिम शेख,रायझिंग मेडीकेअर हॉस्पिटलचे संचालक डॉ. विनोद भारती,सातव हायस्कूलचे प्राचार्य एस. एम.शेख,रोटरी क्लब ऑफ हडपसर सेंट्रलचे अध्यक्ष सोमिनाथ तनपुरे, व क्लबचे इतर सदस्य तसेच मिनाकाकी सातव,उपसरपंच शांताराम कटके,बाळासाहेब सातव आदी उपस्थिती होते.

अध्यक्ष रो. सोमिनाथ तनपुरे
रोटरी क्लब ऑफ हडपसर सेंट्रल