Editor
Rtn. Shubhangi Mulay
September-2024
District Governor
Rtn. Shital Shah

गुरुवंदना Back

खास शिक्षक दिनानिमित्त!    गुरुवंदना

मम भाग्यासी वर्णू कैसे,

ऐसी मज गुरु लाभे,

सुर तालाचे भरुनी कुंभ ही,

राग रंग रस वाटे!

नादपूर्ण जीवनी हिच्या या, सहजची लय ताली वाहे,

रवी शशिसम दृष्टी जाणती,

दावी सुर सौंदर्य नवे!

गुरुब्रह्म हृदयी माझ्या हे,

विराजिता ते मंगलरूपे,

सप्तसुरातुनी वाणी माझीही,

गाई स्वर ॐकार ते!

गाई स्वर ॐकार ते   

         

रो.जयश्री कुबेर

रोटरी क्लब ऑफ पुना

झोनल चेअर :- व्होकेशनल कमिटी (२०२४ - २०२५)